Monday, March 30, 2009

Casual..

खरतर आज विशेष काही विषय नाहीये डोक्यात...पण तरीही काहीतरी लिहावे असं वाटतयं !!
माझे गेल्या काही दिवसांमधले अनुभव/ उमटलेले विचार इत्यादी इत्यादी...

* सध्या गान्धीजींचे 'माझे सत्याचे प्रयोग' वाचतोय.

त्यांनी कुठलाही अभिनिवेष न ठेवता अत्यंत सहजपणे, एखाद्याशी गप्पा मारताना आपण बोलतो तसे लिहिले आहे..गान्धीजींनी त्यांच्या बाल/तरुण वयातील चुका आणी नंतरच्या काळातील त्यांच्या achievements अगदी सारख्याच त्रयस्थ भाषेत लिहिले आहेत. पुस्तक वाचताना गान्धीजी सामान्य जीवनाच्या अगदी पलीकडे पोचल्यासारखे वाटतात (without common man's feelings like राग/ लोभ/ मत्सर/दु:ख/कौतुक इ.इ.).

सध्या गान्धीजींचा द. आफ्रीकेमधील कार्याचा भाग वाचत आहे. अजुनही त्यांचा स्वत:चा शोध चालु आहे. इथुन पुढे त्यांचा 'सत्य' आणी ' अहिंसा' ही तत्वे सापडण्याचा प्रवास interesting असेल असे वाटतयं.

परवा रात्री २ वाजता अहिंसेचा अति डोस झाल्यावर मी " ३००" पाहीला :)

* गेल्या अनेक दिवसांपासुनची काहीशी अस्वस्थ मनःस्थिती कायम आहे. (च्यायला जन्माला जवळ जवळ २५ वर्षे झाली तरिही अजुन उरलेल्या अन्दाजे तेवढ्याच काळात नेमके काय साध्य करायचे आहे याचा काहिही पत्ता नाही).मला वाटते बहुदा मला "life" कसे approach करावे ते अजुनही कळत नाहीये !

एकीकडे मला खास स्वःतापुरती अशी एक"Philosophy" तयार करायची आहे आणि त्याचबरोबर निरनिराळे अनुभव घेउन स्वःताला "explore" ही करायचे आहे. वैचारिक 'analysis' (कदाचित निरर्थक ही) करताना बहुदा कित्येक 'क्षण' अनुभवण्याचेच राहुन जात आहेत. फार दिवस ह्या'phase' मधे असल्याने ह्याच्या पुढे जाउ की नाही अशी रास्त शंका पण वाटु लागली आहे.

काहीतरी उत्तर शोधावेच लागेल आता. हे सगळे असुनही सुट्टीचे ३ दिवस नेहमीप्रमाणेच नुस्तेच इकडे तिकडे करण्यात घालवले :(

* Actually i have a rough idea about, what i want to be .. i see myself as a human being who knows 'what is this all about' n who has achieved peace...

The only problem is... "i dont know how to reach that human being"




1 comment:

Gaurav Marathe said...

mazehi te avadiche pustak ahe.
one of the best